राखी पौर्णिमा

श्रावणातला दुसरा सण आला
राखी पौर्णिमा म्हणती तयाला
बहिणी भावांना औक्षण करण्या आल्या
हाती भावांच्या राख्या बांधिल्या
भाऊबहिणीचाच हा सण ठरला
बहिणीच्या हिता भाऊ सज्ज झाला
ओवाळणी भाऊ घाली बहिणीला
राखी शोभा देई हाताला
बहिणीला भावाचा प्रेमाधार मिळाला
मग आता मणी भीती कशाला

नागपंचमी

श्रावण महिना आला आला
व्रत अन सणांनी तो हा भरला
पहिली आली नागपंचमी
स्त्रिया-मुलींची झाली चंगळ नामी
प्रत्येक स्त्रीबाला कंगन ल्याली
हाती मेंदीची नक्षी उमटली
दूधलाह्या घेऊनि बाला निघाली
नागपूजेची तयारी ही झाली
चुईफुई, झिम्मा, फुगडी रंगली
खेळ-खेळता रात्र ती संपली

गुढीपाडवा

नव वर्षाचा सण आला पहिला
गुढी पाडवा म्हणती सर्व तयाला
घराघरांवर गुढ्या उभारल्या
फुल तोरणांनी चौकटीही सजल्या |

साखरगाठी देती एकमेकाला
गूळ आणि कडुलिंबाचा खाती पाला
गोड गोड पदार्थ मिळती खायला
नवीन कपडे मिळती घालायला |

नटुनी थटुनी जाती देवाला
नाहीतर नव्या नव्या उद्घाटनाला
सण वर्षाचा हा पहिला
आला आला वर्षारंभाला |