गणपती देवा रे गणपती देवा
पायी तुझ्या वाजतसे रुणुझुणु वाळा
अष्टगंध उभा लाविला कपाळा
दुर्वांचा हार तो शोभे तुझ्या गळा ||१||
चार हात सुंदर दिसती तुजला
त्रिशूल एक तू हाती धरला
उंदीरवाहन पायाशी राहिला
असा थाट तुझा आम्हीही पहिला
कमल केवडा तुजसाठी आणिला
सोंड तुझ्या छातीवर आहे रे कशाला?
२१ मोदक तुला खावयाला
खिरीची वाटीही तुझ्या सोबतीला
शुभकार्याला पहिला मान तुला
६४ कलांनी तू अवतरला
संकटहर्ता म्हणती तुजला
बुद्धिदाता दे बुद्धी आम्हाला
संकट हर्ता , असा शब्द हवा
धन्यवाद – चुक निदर्शानास आणून दिल्याबद्दल