पंढरीचा पांडुरंग भक्तीरस

|| भक्तीरस ||

श्री विठ्ठल!
श्री विठ्ठल!

पंढरीचा पांडुरंग
सखा माझा हो श्रीरंग (२ वेळा)
मन होऊ दे दंग, मन होऊ दे दंग
मुखी गाऊ दे अभंग || पंढरीचा पांडुरंग || १ ||

उठुनिया प्रातःकाळी उठुनिया प्रातःकाळी
मूर्ती पाहू दे सावळी, मूर्ती पाहू दे सावळी
दूध दह्याने नाहली दूध दह्याने नाहली
स्नानाने शुचिर्भूत जाहली || पंढरीचा पांडुरंग || २ ||

भाळी बुक्का हा लागला (२ वेळा)
ललाटी उभा गंध आला (२ वेळा)
गळा सजल्या तुळशीमाळा (२ वेळा)
विठू नटला हो राऊळा || पंढरीचा पांडुरंग ||

टाळ मृदुंग गजर झाला (२ वेळा)
विठू नामघोष झाला (२ वेळा)
संतसज्जन मेळा रंगला (२ वेळा)
भान हरपुनी गेला || पंढरीचा पांडुरंग ||

वारकरी – परिसर फुलला (२ वेळा)
दिंड्या पताका चहुबाजु दिसल्या (२ वेळा)
नामघोषात आसमंत दुमदुमला (२ वेळा)
भक्तीरस अंगी संचरला || पंढरीचा पांडुरंग ||

रचना – श्रीमती शैलजा अविनाश पाटील
७ जुलै २०१८.