रे पाखरांनो

 

होत आल्या तिन्ही सांजा
जा पाखरांनो निघा घरट्याकडे जा
भरारी मारुनी शिणल्या शरीरा
घरट्यात झोकून द्या जरा |

कोंबडा देईल बांग कधी, कान तुम्ही टवकारा
चिवचिवाट करुनि आसमंत सारा
मनुजास तुम्ही जागे करा |
म्हणा पंखात घेवूनी शक्तीचा झरा
ध्येय प्राप्तीस सोडितो पहाटेच घरा
तुम्हीही सत्वर उठा जरा
आळसास त्या बाजूस करा |

जीव अमुचा चिमुकलासा तरीही पंख पसरुनी अंतर कापतो भरारा
एवढ्या मोठ्या देहाचा भल्यासाठी तुम्ही उपयोग करा |
ईश्वराने दिली ज्ञानेंद्रिये तुम्हाला
बुद्धीची जोडही हि तुमच्या वाट्याला

मग अडले हो तुमचे कशाला?
या सर्वांचा उपयोग करुनि उज्ज्वल करा जीवनाला

मित्र

 

आज मी काय केले?
एक लहानसे रोप लावले
रोपाला त्या पाणी घातले
अन निरीक्षण त्याचे मी केले |

सकाळी उठताच अंगणात गेले
रोप माझे मला अंगणात दिसले
रोपाला त्या मी पाणी घातले
मला वाटले रोप मजकडे बघून हसले |

रोज रोज असेच घडले
हसणारे रोप मोठे मोठे झाले
पाना-फुलांनी सारे बहरूनी गेले
बघता बघता काय झाले?

झाडाने साऱ्या उन्हाला घेरले
आम्हा सर्वांवर सावलीचे छत्र धरले
झाड मधुर फळांनी गच्चं भरले
फळे तोडून तोडून दमून गेले
अहो एका एका झाडाने आम्हा समृद्ध केले

म्हणून म्हणते –
झाड आपले मित्र
त्यांना लावू आपण सर्वत्र

येई हा वारा

(कवितेची चाल “होठों में ऐसी बात” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube व्हिडिओ बघा)

येई हा वारा पाऊस घेऊन येई
बरसून धारा हर्ष होतो ठायी हो ठायी
येरे ये पावसा येरे
सवे तुझ्या बहर घेरे हां
येई हा वारा –
रे SS पावसा
नभी इंद्रधनू रंग उधळीत ये
आ S आ मोर पदन्यास तू घेऊन ये
पिसारा मागे फुले (आहे)
मयूर हा सुंदर डोले
पुढे चाले तो झलके हो अंबर धरती
येई हा वारा पाऊस घेऊनि येई
बरसून धारा हर्ष होतो ठायी हो ठायी
येरे पावसा येरे सावे तुझ्या
बहर घेरे
रे S S पावसा
निरझर डोंगरी या झूळ S S झूळ वाहे आ आ
नाद त्याचा मधुर कानी घुमतो आहे आ आ
तुषार मोती झुले
काय शाहरुनी खुले
मुदित होते हो सृष्टी हि सारी जगती |

येई हा वारा S S
रे S S पावसा
वनी हिरवे गालिचे पसरट ये आ आ
तरूवरी सुमने ती उमळीत ये
वनी हिरवे गालिचे पसरीत ये आ आ
तरूवरी सुमने ती उमळीत ये
कुसुम वन ते फुले
भ्रमर तो वरती डुले
फुले, फळे हो बहार पक्षी पक्षी उडती |
येई हा वारा S S
रे S S पावसा
मोर चातकाला तृप्त करीत ये आ S आ S
बाल कृषिवला मुग्ध करीत ये
धरती अंबर खुले
लक्ष्मी उचली पावले
होती हर्षित जन हो अवनी वरती ||धृ||

माझ्या अंगणात

 

(कवितेची चाल “म्हारे हावडा मी नाचे मोर” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube व्हिडिओ बघा)

माझ्या अंगणात नाचतोय मोर
तक थैय्या थैय्या
इंद्रधनूची उठली कोर
लागे रंग उधळया

आला पाऊस आल्या धारा, धरतीला भिजवाया
माझ्या अंगणात नाचतोय मोर तक थैय्या थैय्या ||१||

तू सुंदर सुंदर पक्षी
तुझ्या तनूवर मोहक पक्षी – ओ ओ ओ
ताव रूपाने ताव ऐटीने
मोहित केले मम् पक्षी

मम् मोदचे कारण बनुनी आला रे तू मयुराया
माझ्या अंगणात नाचतोय मोर तक थैय्या थैय्या ||२||

तू झालास पक्ष्यांचा राजा
पक्षी राष्ट्रीय बनलास माझा ओ ओ ओ
तुझ्या रंगाने अन नृत्याने
मोहरले जीवन आहे
तव नृत्याने तव बोलीने मोहित झाली मम् काया
माझ्या अंगणात नाचतोय मोर तक थैय्या थैय्या ||३||

हे काळे काळे घण आले
पाहुनी तव मन मोहित झाले
तव नृत्याचा तव हर्षाचा
ठसा मनी उठला आहे
मनात ठसूनी डोळ्यात बघुनी घे निरोप मनरमना
माझ्या अंगणात नाचतोय मोर तक थैय्या थैय्या ||४||

 

वृक्ष माळावरचा

 

एक वृक्ष उभा अविरत माळावरती
पेलीत असंख्य फांद्यांचे ओझे खांद्यावरती
त्याच्या असंख्य फांद्या फळाफुलांनी बहरती
आणि त्याकडे पाहून जण डोळ्याचे पारणे फेडिती ||

जेव्हा हलकेच येई वारा अवखळ
तेव्हा ऐकू येई पानांची सळसळ
ऐकू येई सुस्वर कूजन रसाळ
पाहत रहावी वाटे फळे अति मधाळ
इतक्यात सुरु ऊन-सावलीचा खेळ
पाहण्यात किती तरी जय माझा वेळ
हा उठवितो मनामध्ये तरंग काही काळ
वाटे असाच अविरत उभा राहावा हा शोभवित माळ |

धरणी

 

धरणी ग धरणी |
किती होतेस व्याकुळ मनी |
पावसाळ्याचा दिनी,
मिळे ना कोठे तुज पाणी ||१||

खंत तुझ्या वाटे मनी
म्हणून का भेगा तुझ्या तनी ?
पडेल का पाऊस या क्षणी
मिटविल का काळीज तडा कुणी ? ||२||

हे तर काम मेघाचे
आळवुनी जिंका मन त्याचे
सांगा कोणी तरी त्याला
धरणीने या टाहो फोडला ||३||

ये ये झरझर खाली ये |
धरणीला त्या साथ दे |
कर तृषार्त धरणीला |
घे दुवा सर्वांचा तुजला ||४||

फूल

 

झाडावर उमलले फूल
सर्वांच्या मनास पाडते भूल |
त्याला सदा पाहत रहावे |
त्याला हलकेच स्पर्शावे |
त्याला हलकेच खुडावे |
त्याला ईश्वर चरणी वहावे
त्याला केसामध्ये माळावे |
त्याने फुलदाणीत सजावे |
मनी इच्छांचे उठते काहूर |
त्याक्षणी झाडापासून होते ते दूर |

पाऊस (जलचक्र)

 

पाऊस आला मुसळधार
पावसात भिजाया मजा वाटे फार
पण हा येतो कोठून ? कोण मज सांगणार ?

सांगा सांगा लवकर सांगा
कोण आणतो यासी सांगा ?
नसेल सांगता येत तर थांबा क्षण एक

सूर्य तापतो नभामध्ये
आणतो उष्णता सृष्टीमध्ये
त्याने पाण्याची होती वाफ

हि वाफ असते हलकी
वाऱ्यासह ती जाते वरती
त्या वाफेचे ढग बनती

लागत थंड हवा ढगाला
पडतो पृथ्वीवर पाऊस त्या क्षणाला

पावसाळा

उन्हाळा संपला आला पावसाळा |
आला आला घेवून थेंबांच्या माळा |
हा पावसाळा फुलवितो झाडांना, फुलांना |
उगवितो पिकांना |
सुखवितो पशुपक्ष्यांना, वाढवितो ओढ्यांना
नदी नाल्यांना |
आनंदित करतो मुलांना, शेतकऱ्यांना |
यावर होते विजनिर्मिती |
त्यावर चालती कारखाने विविध ना |
मिळते सर्वांना धनसंपत्ती भोजन त्यावरी ना |