पंढरीचा पांडुरंग भक्तीरस

|| भक्तीरस ||

श्री विठ्ठल!
श्री विठ्ठल!

पंढरीचा पांडुरंग
सखा माझा हो श्रीरंग (२ वेळा)
मन होऊ दे दंग, मन होऊ दे दंग
मुखी गाऊ दे अभंग || पंढरीचा पांडुरंग || १ ||

उठुनिया प्रातःकाळी उठुनिया प्रातःकाळी
मूर्ती पाहू दे सावळी, मूर्ती पाहू दे सावळी
दूध दह्याने नाहली दूध दह्याने नाहली
स्नानाने शुचिर्भूत जाहली || पंढरीचा पांडुरंग || २ ||

भाळी बुक्का हा लागला (२ वेळा)
ललाटी उभा गंध आला (२ वेळा)
गळा सजल्या तुळशीमाळा (२ वेळा)
विठू नटला हो राऊळा || पंढरीचा पांडुरंग ||

टाळ मृदुंग गजर झाला (२ वेळा)
विठू नामघोष झाला (२ वेळा)
संतसज्जन मेळा रंगला (२ वेळा)
भान हरपुनी गेला || पंढरीचा पांडुरंग ||

वारकरी – परिसर फुलला (२ वेळा)
दिंड्या पताका चहुबाजु दिसल्या (२ वेळा)
नामघोषात आसमंत दुमदुमला (२ वेळा)
भक्तीरस अंगी संचरला || पंढरीचा पांडुरंग ||

रचना – श्रीमती शैलजा अविनाश पाटील
७ जुलै २०१८.

संतमेळा

 

(कवितेची चाल “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” ह्या गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube बघा)

नाच रे देवा संतांच्या मेळ्यात
नाच रे देवा नाच ||धृ||

नामा विठूसंगे दिसतो रे
मुखी हरी नाम जपतो रे
पंजाबासी जावून, भक्तीरस देवून
झाला हा संत महान नाच रे देवा ||१||

पहाटेच्या मंगल वेळी रे
जात्यावरी ओव्या गाती रे
ही तर जनी | विठू हिच्या मनी
जनीचे करा रे ध्यान
नाच रे देवा ||२||

आपेगावचा ब्लॅक आला रे
ज्ञानियांचा राजा झाला रे
ज्ञानेश्वरी लिहून, जनासाठी मागून
घेतले रे पसायदान
नाच रे देवा ||३||

हा कुंभार गोऱ्हा आला रे
गाजर विठूचा करतो रे
विठू नामी विलीन, पायी माती तुडवून
बाळाचे केले हो दान
नाच रे देवा ||४||

मात्यापित्यांची सेवा करतो रे
विठ्ठल मनी स्मरतो रे
विठू आला घरी, उभा विटेवरी
पुंडलिका समाधान
नाच रे देवा ||५||

सावंत मळ्यात राबतो रे
भाजीचा मळा फुलतो रे
विठू नाम घेवून, दवा जन देवून
लोका देई जीवदान
नाच रे देवा ||६||

गाढवासी पाणी पाजले रे
तहान त्याची भागली रे
मोठेपण विसरून, देती जगा दाखवून
एकनाथ दयेचे प्रमाण
नाच रे देवा ||७||

अभंगगाथा लिहिले रे
इंद्रायणीत तरली रे
भक्तासाठी धावून, आला विठू मागून
धन्य झाले तुकाराम
नाच रे देवा ||८||

विठ्ठल मेळ्यात रमतो रे
भक्तांसमवेत नाचतो रे
भक्ती मनी ठेवून, संत जाती हर्षुन
विसरले देहभान
नाच रे देवा ||९||

विठू माझा लेकुरवाळा
सांगे सॅन सज्जनांचा मेळा…. (२ वेळा)

 

कान्हा रे कान्हा रे

 

(कवितेची चाल “डोला रे डोला रे डोला” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube बघा)

कान्हा रे कान्हा रे कान्हा रे कान्हा रे कान्हा रे
हे कान्हा, हो कान्हा, हा कान्हा, रे कान्हा.
वाजवुनिया बासरी घालुनिया साद
होते मी दंग ऐकुनिया नाद

बांधुनी मी घुंगरू, घालुनिया पायल
मी नाचते नाचते नाचते नाचते नाचते

कान्हा रे कान्हा रे कान्हा रे कान्हा रे
हां हां हां हां

पहा रे पहा कशी झंकारही आली
प्रियाच्या भेटीसाठी आतुरही झाली
वेणुनादानेही मोहित झाली
मोहन भेटीसाठी राधाही निघाली
हां हां हां हां

तनामनात माझ्या तोच आहे.
अक्षीही माझ्या तोच आहे.
माझ्या स्वप्नीही तोच आहे.
श्वासी माझ्याही तोच आहे.

कंगनाची खन खन तीच आहे
खन खना खन खन
पायलची छन छन तीच आहे.
छन छना छन छना
छन छन.

आला रे कान्हा आला रंग घेऊन आला
रंग खेळण्या हा दंग आता झाला
राधेच्या प्रेम रंगात हा न्हाला
गोप गोपी रंग खेळात आला

कान्हाच्या हाती रंग आहे
राधेच्या संगे गोपी आहे.
गोपीत राधा शोधत आहे
राधेवर रँड उडवीत आहे.

कंगनाची खन खन तीच आहे.
खन खना खन खना खन
पायलची छन छन तीच आहे.
छनक छन छन….

वारी

 

आषाढी कार्तिकीला
भक्तजन जाती पंढरीला
टाळमृदूंग सोबतीला
विठूचा गाजर झाला ||१||
विठू विठू लेकुरवाळा
पाठीराखा तू रे भोळा
वेड लाविसी जीवाला ||२||

तुला भेटण्या होतो गोळा
तव पाहुनीच लागे डोळा
स्वप्नामध्येही तूच ठाकला ||३||

विठू तुज सवे रखुमाई
आम्हा लेकरांची ती आई
कळे माया लेकराला ||४||

विठू तू दिनांच्या त्राता
भक्तांच्या तू पाठीराखा
लाभो कृपा-दृष्टी मजला ||५||

गणेश स्वागत

 

गणपती बाप्पा मोरया मोरया
स्वागत करितो तुम्ही या ||धृ||
येते स्वारी उंदरावरुनी
करिती स्थापना मखरातूनी
व्हा आरूढ या सिंहासनी
लावितो कुंकुम भाली या भाली या ||१||
दुर्वा आणल्या बागेमधूनी
कापूर गंध हा दुकानातुनी
करा स्वीकार चिंतामणी
सोंड वाकडी करुनिया करुनिया ||२||
अठरा लाडू एकवीस मोदक
पूजेसाठी आणिले उदक
वंदन आमुचे प्रेमे स्वरूप
घ्या ओंकार मानुनिया, मानुनिया ||३||
अहो तुम्ही एकदंत
म्हणता तुम्ही विघ्नहर्ता
आहात तुम्ही बुद्धिदाता
सद्बुद्धी ती आम्हास द्या आम्हास द्या ||४||

गणपती देवा

 

गणपती देवा रे गणपती देवा
पायी तुझ्या वाजतसे रुणुझुणु वाळा
अष्टगंध उभा लाविला कपाळा
दुर्वांचा हार तो शोभे तुझ्या गळा ||१||

चार हात सुंदर दिसती तुजला
त्रिशूल एक तू हाती धरला
उंदीरवाहन पायाशी राहिला
असा थाट तुझा आम्हीही पहिला

कमल केवडा तुजसाठी आणिला
सोंड तुझ्या छातीवर आहे रे कशाला?
२१ मोदक तुला खावयाला
खिरीची वाटीही तुझ्या सोबतीला

शुभकार्याला पहिला मान तुला
६४ कलांनी तू अवतरला
संकटहर्ता म्हणती तुजला
बुद्धिदाता दे बुद्धी आम्हाला

 

सरस्वती पूजन

 

साडे तीन मुहूर्तांपैकी मुहूर्त मनिला |
होते सौर वर्षाची सुरुवात ज्या दिनाला |
होतो नवीन पंचांगाचा आरंभ ज्या प्रारंभाला
गुढीपाडवा म्हणती तयाला |
उभारती गुढ्या तोरणे घराघराला |
नसे तोटा उत्साह आनंदाला |
करिती बालक सरस्वती पूजन ह्या दिनाला
नवीन वस्त्रे अलंकार घालुनी रिझवितो मनाला
जमते मंडळी पक्वान्नांवरी ताव मारायला
खाउनी पक्वान्ने जाती नवीन उदघाटन सोहळ्याला |

कृष्णलीला

 

झाला कृष्णजन्म श्रावण वध्य अष्टमीला
आला पूर कृष्णलीलेला |
कृष्णास आवडे दूधदही भारी |
तो करी दूधदह्याची चोरी |

कृष्ण जाई गवळणीच्या घरा |
करिती त्या समयी गोप सर्व पहारा |
आत फोडती दूधदह्याच्या हंड्या |
ना कळती कुणा गोपकृष्णाच्या खोड्या |
सर्व मिळूनी मारिती ताव दह्यावरी |
गवळणी बसत चडफडत आपल्या अंतरी |

ही करी कृष्ण त्यांची मस्करी |
चोरिलें आपले दूधदही कोणी |
जेव्हा येई गोपिकांच्या हे ध्यानी |
तेव्हा होत चकित त्या मनी |

आपण तर होतो सदनी |
तरी कसा घुसे हा चक्रपाणी |
पादितो कैसी हि भुरळ |
जातो गोपांसमवेत सदनी सरळ |

करितो दूधदह्याचा चट्टामट्टा |
देईन म्हणे त्यासी एक रट्टा |
परी ऐसे कधी होत नसे, होत असे थट्टा
पाहुनी कृष्णाच्या बाललीला जाई राग निघुनी गोपिकांचा |
आहो तो राग घटकेचा |
लुटीत तदनंतर त्या आनंद कृष्णलीलेचा |

गणेशागमन

    होतो प्रतीक्षा करीत ज्यांची |
आली स्वारी त्या गणरायाची |
वाजत गाजत आली स्वारी |
करा पूजा आता सत्वरी |
वाहा लाल फुल दुर्वा डोक्यावरी |
ह्या आरती भजनाची ललकारी
मागा बुद्धी संपत्ती
घ्या प्रसाद हा लवकरी
चला येणार गणराया आपल्या घरी |