दसरा

 

दसऱ्याचा सण हा मोठा
म्हणती आनंदा नाही तोटा

नवीन कपड्यांचा आनंद मोठा |
एकमेका सोने लुटण्याचा आनंद मोठा |
सरस्वती पूजनाचा थाटही मोठा |

झेंडूच्या फुलांनाही मिळतो मान मोठा
या दिवशी नव्या उदघाटनाचा सोहळाही मोठा
गोड गोड पक्वान्नांवर सर्वांचा तावही मोठा

सण हा मोठाच मोठा दसरा |
चेहरा करतो सर्वांचा हसरा |
जवळ आली दिवाळी हा सांगतो ऐका जरा |
दसऱ्यापाठोपाठ दिवाळीच्या
तयारीला लागा सर्व जरा |

4 Replies to “दसरा”

  1. खुपच सुंदर लिहिले आहे # आई!
    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

  2. Khoopch sundar Kavita 👌👌🙏नेहमी वाचाव्यात असे वाटते आपले सण व सणांचे महत्व हे समजते खूप छान👍👍

Leave a Reply

Your email address will not be published.