दसऱ्याचा सण हा मोठा
म्हणती आनंदा नाही तोटा
नवीन कपड्यांचा आनंद मोठा |
एकमेका सोने लुटण्याचा आनंद मोठा |
सरस्वती पूजनाचा थाटही मोठा |
झेंडूच्या फुलांनाही मिळतो मान मोठा
या दिवशी नव्या उदघाटनाचा सोहळाही मोठा
गोड गोड पक्वान्नांवर सर्वांचा तावही मोठा
सण हा मोठाच मोठा दसरा |
चेहरा करतो सर्वांचा हसरा |
जवळ आली दिवाळी हा सांगतो ऐका जरा |
दसऱ्यापाठोपाठ दिवाळीच्या
तयारीला लागा सर्व जरा |
खुपच सुंदर लिहिले आहे # आई!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद!🙏
Khoopch sundar Kavita 👌👌🙏नेहमी वाचाव्यात असे वाटते आपले सण व सणांचे महत्व हे समजते खूप छान👍👍
धन्यवाद!🙏