स्वर जादुई

 

गंध मातीचा; सुगंध फुलांचा
छंद कलांचा; मंद वाऱ्याचा
कुंद ढगांचा, हवेचा; सुंद मातीचा
बंध प्रेमाचा; नंद यशोदेचा
कंद आल्याचा; धुंद गीताचा
बुंद पाण्याचा; वृंद वाद्यांचा

प्रेम

 

प्रेम म्हणजे काय असते?
प्रेम म्हणजे आकर्षण असते
प्रेम म्हणजे आसक्ती असते
प्रेम म्हणजे ओढ असते
प्रेमाला वयाची मर्यादा नसते
प्रेमाला कसलेही भान नसते
प्रेम म्हणजे त्यागही असतो
प्रेमाला वेळ काळ नसतो
प्रेम माणसांवर करावे
प्रेम प्राणी पक्ष्यांवार करावे
प्रेम निसर्गावर करावे
प्रेम निसर्गनिर्मात्यावर करावे
प्रेम निखळ निर्व्याज असावे
प्रेम सतत वृद्धिंगत व्हावे
प्रेम कधीही न घटावे
प्रेमाने मन-मन जिंकावे
प्रेम नसते तर? सारे शून्यच असते
प्रेमावरच अखंड जग हे जगते
तरीही प्रेमाला अमूक एक व्याख्या नसते
प्रेमाची भावना खोल मनात रुजते
प्रेमाने सारी वसुंधरा कवेत येते