दहीहंडी

 

झाला कृष्णजन्म श्रावण वध्य अष्टमीला |
कृष्णलिलांच्या आगळा सोहळा पारण्याला |
फुटती सर्वत्र दूधदह्याच्या हंड्या |
बणती सर्व गोप अन फोडती त्या हंड्या |
चला बनू या आपणही गोप |
चढू या उंच खूप खूप |
फोडू या दहीहंडीला
मिळेल प्रसाद त्याचा तुम्हा आम्हाला |

श्रावणी शुक्रवार

 

आज आहे श्रावणी शुक्रवार तिसरा |
करू या हा आवाज साजरा ज्ञानमंदिरा |
करुनि पूजन मागू या वरदहस्ताला |
देईल माता सुमती-बुद्धिसंपदा बालकाला |

नवरात्र

 

आले नवरात्राचे दिन सामोरी
होईल घटस्थापना घरोघरी |
विराजे देवी नित्य नव्या आसनावरी |
होईल भाविकांची गर्दी तिच्या गाभारी |
कधी बनेल ती व्याघ्राम्बरी |
कधी आरूढ होईल हंसावरी
कधी असे ती महिषासुर मर्दिनी |
कधी असे ती प्रसन्न वदनी |
अशी ही विविधरूप धारिणी |
नवरात्री करू तिची आराधना
करील पुरी ती सर्वांची मनोकामना |

रंगपंचमी

 

फाल्गुन कृष्ण पंचमीला
विविध रंगांचे महत्व या दिनाला
रंगपंचमीचा म्हणती या सणाला
ता, ना, पि, ही, नि, पा, जा सप्तरंगाला
येतो येतो बहर या दिनाला |
एकेमक सारे रंगाने भिजविती
आनंद सारे पंचमीची लुटती |

होळी

 

फाल्गुनात आली होळी
थोर मोठ्यांची चंगळ झाली
घराघरात बनली पुरणपोळी
दारापुढे पेटते होळी रे होळी

होळीमध्ये संपते इडापिडा सगळी
अशी सर्वांची असते समजूत आगळी
थंडीही जाते होळीत लपुनी|
उन्हाच्या पाठीवर थाप मारितें हसुनी
टिमटिम टिमटिम टिमकी वाजवुनी
होळीची गायली जातात गाणी.

संक्रांत

 

पौष महिन्याच्या थंडीत
येतो सण संक्रांत
तीळ आणि गुल घराघरात
मिळूनी दोन्ही वडया बनतात.

तिळगुळ घ्या गोड बोला |
म्हणती सारे या सणाला |

भांडणतंटे विसरुनी
तिळगुळ वाटती साऱ्याजणी
गूळपोळ्या घरोघरी करती या दिनी
हळदीकुंकू करती सुवासिनी |

दसरा

 

दसऱ्याचा सण हा मोठा
म्हणती आनंदा नाही तोटा

नवीन कपड्यांचा आनंद मोठा |
एकमेका सोने लुटण्याचा आनंद मोठा |
सरस्वती पूजनाचा थाटही मोठा |

झेंडूच्या फुलांनाही मिळतो मान मोठा
या दिवशी नव्या उदघाटनाचा सोहळाही मोठा
गोड गोड पक्वान्नांवर सर्वांचा तावही मोठा

सण हा मोठाच मोठा दसरा |
चेहरा करतो सर्वांचा हसरा |
जवळ आली दिवाळी हा सांगतो ऐका जरा |
दसऱ्यापाठोपाठ दिवाळीच्या
तयारीला लागा सर्व जरा |

गणेशोत्सव

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला
गणेशाची भेट ठरली घराघराला
गणपतीला घरी आणण्याला
लागती लोक मोठ्या तयारीला
गणपतीसाठी मखर
गणपतीसाठी फुल-मोत्यांचा हार
गणपतीसाठी लागती दुर्वा
गणपतीमागे केवडा सजवा
गणपतीच्या नैवद्या मोदक बनवा
खिरीची वाटाही पानात लावा
गणपतीसाठी सारी तयारी झाली
स्वारी गणपतीची पहा दारी आली

नारळी पौर्णिमा

नारळी पौर्णिमा हा सण
कोळी लोकांना वाटे महान
सोन्याच्या नारळाने कार्टी समुद्रपूजन
आणि मासेमारीसाठी नवा सोडती छान
नाचगाण्यांना त्यांच्या येतो बहर
नारळीभाताची म्हणती चव घ्या बरं
ओल्या नारळाच्या करंज्या तर
याच सणाला बनती सर्वत्र फार

राखी पौर्णिमा

श्रावणातला दुसरा सण आला
राखी पौर्णिमा म्हणती तयाला
बहिणी भावांना औक्षण करण्या आल्या
हाती भावांच्या राख्या बांधिल्या
भाऊबहिणीचाच हा सण ठरला
बहिणीच्या हिता भाऊ सज्ज झाला
ओवाळणी भाऊ घाली बहिणीला
राखी शोभा देई हाताला
बहिणीला भावाचा प्रेमाधार मिळाला
मग आता मणी भीती कशाला