पंडित नेहरूंचा पोवाडा

 

१८८९ सालात
पुण्यनगरी अलाहाबादेत
नामांकित नेहरू घराण्यात
जन्मला तेजस्वी बालक हो जी जी जी |

जन्म झाला अलाहाबादेत
बालपण गेले निसर्गासमवेत
पुष्प गुलाब फुलले श्रीनगरात
गुलाबाची कोमलता हृदयात जी जी जी |

घरी तया लक्ष्मीचा वास
डोक्यावर सरस्वतीचा हात
मोठेपणी बने न लक्ष्मीचा दास
घेतला त्याने स्वातंत्र्याचा ध्यास जी जी जी |

शांतिदूत म्हणती तयाला
बालकांचा चाचा राहिला
बळकट रममाण झाला
१४ नोव्हेंम्बर बालदिन ठरला जी जी जी |

मणी ठेवून त्याने दूरदृष्टी
जातीयता नष्ट करण्यासाठी
जागी शांतता नांदण्यासाठी
घालविल्या जागरणात राती जी जी जी |

भारताचे आले स्वातंत्र्य हातास
मिळे पंतप्रधानांचा मान त्यास
पंतप्रधान झाल्यावर त्यास
पडे स्वप्न विशाल भारताचे जी जी जी |

केला विज्ञानात देश प्रगत
शेती केली समृद्ध वृद्धिंगत
वैज्ञानिकांची कदर केली देशात
नेला देश प्रगती पथावर जी जी जी |

अशा थोर देशप्रेमी नेत्याला
शतकोटी करू प्रणाम दिनाला
अनुसुरू तयाच्या मार्गाला
घडवू देशाच्या नागरिकाला जी जी जी ||

Leave a Reply

Your email address will not be published.