संतमेळा

 

(कवितेची चाल “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” ह्या गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube बघा)

नाच रे देवा संतांच्या मेळ्यात
नाच रे देवा नाच ||धृ||

नामा विठूसंगे दिसतो रे
मुखी हरी नाम जपतो रे
पंजाबासी जावून, भक्तीरस देवून
झाला हा संत महान नाच रे देवा ||१||

पहाटेच्या मंगल वेळी रे
जात्यावरी ओव्या गाती रे
ही तर जनी | विठू हिच्या मनी
जनीचे करा रे ध्यान
नाच रे देवा ||२||

आपेगावचा ब्लॅक आला रे
ज्ञानियांचा राजा झाला रे
ज्ञानेश्वरी लिहून, जनासाठी मागून
घेतले रे पसायदान
नाच रे देवा ||३||

हा कुंभार गोऱ्हा आला रे
गाजर विठूचा करतो रे
विठू नामी विलीन, पायी माती तुडवून
बाळाचे केले हो दान
नाच रे देवा ||४||

मात्यापित्यांची सेवा करतो रे
विठ्ठल मनी स्मरतो रे
विठू आला घरी, उभा विटेवरी
पुंडलिका समाधान
नाच रे देवा ||५||

सावंत मळ्यात राबतो रे
भाजीचा मळा फुलतो रे
विठू नाम घेवून, दवा जन देवून
लोका देई जीवदान
नाच रे देवा ||६||

गाढवासी पाणी पाजले रे
तहान त्याची भागली रे
मोठेपण विसरून, देती जगा दाखवून
एकनाथ दयेचे प्रमाण
नाच रे देवा ||७||

अभंगगाथा लिहिले रे
इंद्रायणीत तरली रे
भक्तासाठी धावून, आला विठू मागून
धन्य झाले तुकाराम
नाच रे देवा ||८||

विठ्ठल मेळ्यात रमतो रे
भक्तांसमवेत नाचतो रे
भक्ती मनी ठेवून, संत जाती हर्षुन
विसरले देहभान
नाच रे देवा ||९||

विठू माझा लेकुरवाळा
सांगे सॅन सज्जनांचा मेळा…. (२ वेळा)

 

Leave a Reply

Your email address will not be published.