शूर शिपाई

 

देशाचे आम्ही शूर शिपाई
आम्ही कोना भीत नाही
पाऊल आमचे पुढेच जाई
भीतीची तर बाधा नाही ||१||

शत्रुंवरती करू चढाई
उनपाऊस तमा नाही
देशरक्षिण्या सज्ज सदा हि
देशवीण ते प्रिय ना काही ||२||

नेहरू, गांधी आमचे नेते
नेताजी अन सुभाष चाहते
सत्य अहिंसा तत्व जयांचे
ठेवू ध्यानी भविष्यातही ||३||

ठेवू तिरंगा फडकत नेहमी
प्राणांचीही पर्वा नाही
देशावर्ती संकट येई
होऊ बांधव एक आम्ही ||४||

Leave a Reply

Your email address will not be published.