वृक्ष माळावरचा

 

एक वृक्ष उभा अविरत माळावरती
पेलीत असंख्य फांद्यांचे ओझे खांद्यावरती
त्याच्या असंख्य फांद्या फळाफुलांनी बहरती
आणि त्याकडे पाहून जण डोळ्याचे पारणे फेडिती ||

जेव्हा हलकेच येई वारा अवखळ
तेव्हा ऐकू येई पानांची सळसळ
ऐकू येई सुस्वर कूजन रसाळ
पाहत रहावी वाटे फळे अति मधाळ
इतक्यात सुरु ऊन-सावलीचा खेळ
पाहण्यात किती तरी जय माझा वेळ
हा उठवितो मनामध्ये तरंग काही काळ
वाटे असाच अविरत उभा राहावा हा शोभवित माळ |

Leave a Reply

Your email address will not be published.